
नदीवरील शिरढोण पुलाजवळ पंचगंगा नदीला जलपर्णीचा िवळखा पडला असून कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेली पाईपलाईनलाही जलपर्णीने वेढा दिला अाहे. जलपर्णीेने पाणी दुषीत झाले अाहे. पावसाळ्यात तुटलेली जलपर्णी नदीकाठच्या शेतात पसरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत अाहे. जलपर्णीमुळे झाकाेळलेली पाईप लाईन इचलकरंजी महापालिकेने काढून घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
कोल्हापूर/कुरुंदवाड : दरम्यान सन २०१९ सालच्या महापुरा दरम्यान जलपर्णी पुलावर पसरली हाेती. पुलाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बॅरिकेड्स कट केले होते.
पंचगंगा नदीला जलपर्णी प्रत्येक वर्षीची समस्या आहे. कोल्हापूर जलपर्णी प्रवाहित होऊन शिरढोण पुलापर्यंत येते. शिरढोण पुलाजवळ कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला येऊन चिकटते. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही जलपर्णीचे जाळे निर्माण होते. जून महिन्यातील पावसाच्या पाण्याने जलपर्णीचे जाळे सूटत नाही. ते पाण्यासोबत पुलाला थटते. आणि नदीकाठच्या शेतीत विसावते. यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या वर्षी कृष्णा पाणी योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्याने नदीपात्रातून दुसरी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
चाैकट : पाईपलाईन काढावी
पाईपलाईनला भविष्यात जलपर्णी थटू नये, या दृष्टिकोनातून ती नदीच्या खडकात जर मारून बसविण्यात आली आहे. जुनी बंद असलेली पाईपलाईन काढल्यास पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी प्रवाहित होईल आणि प्रत्येक वर्षी होणारा जलपर्णीचा त्रास बंद होईल, तरी प्रशासनाने पाईपलाईन काढावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.