agri kunbi dispute

आज सकाळी टिटवाळा पोलीस ठाण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कारण पंचमहाभूत आगरी संघटनेचे गणेश पाटील त्यांच्या शेकडो समर्थकांसह टिटवाळा पोलीस ठाण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण पोलीस ठाण्यासमोर लोक गोळा झाल्याने पोलीसही हैराण होते.

अमजद खान, कल्याण: आगरी कुणबी वाद हा तसा नवीन नाही. आता परत हा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण कुणबी समाजाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्या विरोधात आज टिटवाळा पोलीस ठाण्यासमार(Titwala Police Station) शेकडोच्या संख्येत पंच महाभूत आगरी संघटनेच्या (Panchmahabhut Agri Sanghatna) नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर आक्षेपार्ह पोस्ट (offensive Post) लिहिणाऱ्या तरुणाने आगरी समाजाची माफी मागितली पाहिजे. त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

आज सकाळी टिटवाळा पोलीस ठाण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कारण पंचमहाभूत आगरी संघटनेचे गणेश पाटील त्यांच्या शेकडो समर्थकांसह टिटवाळा पोलीस ठाण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण पोलीस ठाण्यासमोर लोक गोळा झाल्याने पोलीसही हैराण होते. मात्र विषय गंभीर असल्याने पोलिसांनी आलेल्या सगळ्या तरुणांना आधी शांत केले.

याबाबत गणेश पाटील यांचे म्हणणे आहे की, काही समाजकंटक आहे. त्यांना आगरी आणि कुणबी या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आज आगरी कोळी समाज एकजुटीने एकत्र चालतो. आमची तशी शिकवण आहे. किती समाजकंटक जन्माला आले तरी आम्ही एकत्र एका हेतूने काम करत राहू. आम्ही भूमीपत्र सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहोत. आम्ही संविधानाला धरून आणि संविधानाचा आदर करीत वाटचाल करणारे लोक आहोत. मात्र एक व्यक्ती समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर त्याने आक्षेपार्ह विधान केले. त्याने आपल्या विधानाबद्दल जाहिरपणे माफी मागावी आणि हा विषय संपवावा. तसेच या इसमाच्या विरोधात वकिल सुशांत पाटील यांच्या नेतृत्वात चारही जिल्ह्यातील न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

नितेश जाधववर कारवाई
याबाबत टिटवाळा पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. मात्र आगरी कोळी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान आता टिटवाळा पोलिसांनी आगरी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुणबी समाजाच्या नितेश जाधव नावाच्या तरुणावर कारवाई केली. एवढेच नाही तर नितेशने ऑडिओद्वारे समाजाबद्दल जे काही आक्षेपार्ह विधान केले होते त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.