पंढरपूर-म्हैसूर एक्सप्रेस दररोज धावणार; कर्नाटकातील व महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांची सोय

कर्नाटकातील विठ्ठल भक्त विठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे येतात. त्यांच्या मागणीला यश आले आहे. मध्य रेल्वेने म्हैसूर- पंढरपूर व पंढरपूर- म्हैसूर रेल्वे गाडी सुरू केली आहे.

    पंढरपूर : कर्नाटकातील विठ्ठल भक्त विठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे येतात. त्यांच्या मागणीला यश आले आहे. मध्य रेल्वेने म्हैसूर- पंढरपूर व पंढरपूर- म्हैसूर रेल्वे गाडी सुरू केली आहे. म्हैसूर येथून पंढरपुरात आलेल्या पहिल्या रेल्वेचे स्वागत आमदार समाधान आवताडे यांनी केले.

    मध्य रेल्वेने म्हैसूर-पंढरपूर व पंढरपूर म्हैसूर अशी ‘गोल घुमट एक्सप्रेस’ रेल्वे गाडी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची सोय होणार आहे. पंढरपूर येथे म्हैसूर- पंढरपूर रेल्वेचे स्वागत करताना युवा नेते प्रणव परिचारक, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, दीपक पवार, सुरेश लाड, शशिकांत हरिदास, काशिनाथ थिटे, प्रा. डॉ. चांगदेव कांबळे, सुनील डोंबे, दिपक येळे, राजेंद्र बेऊर आदी उपस्थित होते.

    …अशी धावणार गाडी

    सोमवारी (दि. ४ सप्टेंबर) मैसूर येथून पंढरपूरकडे ही रेल्वे गाडी मार्गस्थ झाली. मंगळवारी (दि. ५ सप्टेंबर) दुपारी २ वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकात ती आली. या रेल्वेचे स्वागत आमदार समाधान आवताडे यांनी केले. रेल्वे पुन्हा पंढरपूरहून म्हैसूरकडे मार्गस्थ झाली. ही रेल्वे गाडी दररोज म्हैसूर येथून पंढरपूर व पंढरपूर येथून मैसूरकडे धावणार आहे.