
पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला येणारे भाविक विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. भाविकांना चांगल्या दर्जाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या लाडू प्रसादाची (Pandharpur) मागणी वाढली आहे. मंदिर समितीने ठेकेदारी पद्धत रद्द केली आहे. समिती स्वतः लाडू तयार करून विक्री करत आहे. या लाडू विक्रीतून (Ladu Sale) मंदिर समितीला एकाच महिन्यात सुमारे दहा लाखांचा नफा (Profit From Ladu Prasad) मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
समितीकडून तयार केले जाता लाडू
पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला येणारे भाविक विठुरायाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करतात. भाविकांना चांगल्या दर्जाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ठेकेदाराकडून लाडू तयार करून मंदिर समिती त्याची विक्री करत होती. मात्र काही दिवसांपूर्वी मंदिर समितीने (vitthal Rukmini Temple) लाडू तयार करण्याचा ठेका रद्द केला. समितीने स्वतः लाडू तयार करण्याचं काम आपल्या हातात घेतलं.
मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ
मंदिर समितीकडून तयार केल्या जाणाऱ्या लाडू प्रसादाला आता भाविकांकडूनही उत्तम मिळू लागला आहे. दररोज साधारण पाच हजारापेक्षा जास्त लाडूंची २० रूपये इतक्या अल्प दरात विक्री होत असते. मंदिर समितीने लाडू तयार करण्याचं काम हाती घेतल्यापासून लाडू प्रसादापासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कमालीची वाढ झाली आहे. १४ एप्रिल ते २० मे दरम्यानच्या काळामध्ये मंदिर समितीने जवळपास दोन लाख ५२ हजार ९०० लाडू तयार केले होते. लाडू विक्रीतून सुमारे २५ लाख २९ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. त्यातून १५ लाख ७० हजार रुपये इतका खर्च आला आहे. खर्च वजा करता मंदिर समितीला फक्त एका महिन्यामध्येच लाडू विक्रीतून सुमारे दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.