girl name shivsena

नावाचा महिमा मोठा असल्याने डोंबिवलीतील एका बदाद्दराने त्याच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. मुलीने नाव शिवसेना ठेवणाऱ्या या शिवसेना (Shivsena) प्रेमीचे नाव पांडुरंग वाडकर असे आहे.

    अमजद खान, कल्याण: शेक्सपिअरने म्हटले आहे की, नावात काय आहे. तर असे नाही. नावातच सर्व काही आहे. नावानेच माणूस ओळखला जाते. नावाचा महिमा मोठा असल्याने डोंबिवलीतील एका बदाद्दराने त्याच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. मुलीने नाव शिवसेना ठेवणाऱ्या या शिवसेना (Shivsena) प्रेमीचे नाव पांडुरंग वाडकर असे आहे. ते डोंबिवलीतील (Dombivali)  शेलारनाका परिसरात राहतात. वाडकर यांच्या स्वप्नात बाळासाहेब आले आणि त्यांनी मुलीचे नाव शिवसेना (Girl Name Shivsena) ठेवायला सांगितलं, असं त्यांचं म्हणणं आहे.

    शिवसेनाची स्थापना प्रबोधनकारांच्या उपस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. शिवसेना पक्षा मोठा इतिहास आहे. शिवसेनेने आजवर अनेक चढ उतार पाहिले. शिवसेना आणि मराठी माणूस असे एक समीकरण होते. सामान्यांचा आवाज म्हणजे शिवसेना होती. या पंचाक्षरी शब्दात मोठा मंत्र होता. तोच मंत्र घेऊन शिवसेना 1995 साली सत्तेवर आली. साडे चार वर्षाच्या सत्तेनंतर ती पायउतार झाली. या सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हाती होता. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार असा प्रश्न होता. मात्र त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी पक्षाची कमान संभाळली.

    महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेना फुटली. या फूटीनंतर पक्षाचे दोन तुकडे पडले. एक बाळासाहेबांची शिवसेना तर दुसरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षात अनेक स्थितंतरे होत असता शेलार नाका येथे राहणारे वाडकर यांच्या स्वप्नात चक्क बाळासाहेब आले. त्यांनी सांगितले की, घाबरु नकोस, तुझ्या घरात शिवसेना आहे. वाडकर यांना झालेला स्वप्नातील दृष्टांत पाहून ते झोपेतून खडबडून जागे झाले. त्यांनी त्यांना पडलेले स्वप्न ध्यानात घेऊन त्यांच्या मुलीचे नावच शिवसेना ठेवले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचायतीत केली आहे. त्यांच्या शिवसेना प्रेमाची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.