‘पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करत आहेत’, राणे समर्थकाचा आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील म्हणाले की, “केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

    मुंबई : माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर त्यांच्या संतप्त समर्थकांनी तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार अडवल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपामधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील म्हणाले की, “केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असं मतही व्यक्त केलं आहे.