कार्यकर्त्यांच्या राड्यानंतरही पंकजा मुंडे एकदम शांत! दोन दिवसांनी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष

विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेले नाही. याचे पडसाद मराठवाड्यात उमटत असताना, पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यावर बोलणे टाळले आहे, दोन दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करु, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजीच त्यांची व्यक्त केल्याचे दिसते आहे. आता दोन दिवसांनी पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे(Pankaja Munde is very calm even after the workers' rally).

    मुंबई :  विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळालेले नाही. याचे पडसाद मराठवाड्यात उमटत असताना, पंकजा मुंडे यांनी मात्र या सगळ्यावर बोलणे टाळले आहे, दोन दिवसांनी आपण भूमिका स्पष्ट करु, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याची नाराजीच त्यांची व्यक्त केल्याचे दिसते आहे. आता दोन दिवसांनी पंकजा मुंडे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे(Pankaja Munde is very calm even after the workers’ rally).

    पंकजा मुंडे यांच्याऐवजी गोपानीथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक, ओबीसी महिला नेत्या आणि पिंपरी चिंचवडच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. यानिमित्ताने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत. तर यानिमित्ताने मुंडे-महाजन यांचे भाजपातील योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवसेनेतून करण्यात येते आहे.

    पंकजा मुंडे यांचा भाजपाच्या विधानपरिषदेच्या पाच नावात समावेश नसल्याने पंकजा यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. औरंगाबादेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी, भाजपाच्याच कार्यालयावरच मोर्चा काढत, उमेदवारी नाकारल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

    भाजपाचे नेते हे ओबीसी नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठवाड्यातील परभणी सारख्या जिल्ह्यातूनही उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपावर रोष व्यक्त होताना दिसतो आहे. सोशल मीडियावर नाराजी दर्शवत, ताई नाही, अशा प्रतिक्रिया भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून आणि कार्यकरत्यांकडून व्यक्त होतायेत.