Pankaja Munde Dasara Melava 2023
Pankaja Munde Dasara Melava 2023

  बीड/परळी : आज परळी येथे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांची मंचावर उपस्थिती होती. या व्यासपीठावर अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी धनंजय मुंडे सध्या सरकारमध्ये असताना त्यांच्या उपस्थितीमुळे पंकजा मुंडे उपस्थित राहणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. परंतु, विकासासाठी माझी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
  परळीत होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’च्या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहण्यावरून शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी या सभेला हजर राहत विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची आपली तयारी आहे, अशी भूमिका मांडली आहे.
  विकासासाठी कोणताही द्वेष बाळगणार नाही
  परळीची कन्या म्हणून मी या व्यासपीठावर आली आहे. विकासासाठी कोणताही द्वेष बाळगणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या म्हणाल्या आहेत.
  कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला
  महाराष्ट्र सरकारच्या वतीने परळीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले आहेत. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
  परळीच्या जनतेने अनेक वर्षे आमच्यावर प्रेम केलं
  पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पालकमंत्री असताना कधीच जातपात पाहिली नाही. पक्ष देखील पाहिला नाही. मनात कोणताच द्वेष ठेवला नाही. त्यामुळे परळीकरांच कर्ज माझ्या आणि धनंजय मुंडे यांच्या डोक्यावर आहे. परळीच्या जनतेने अनेक वर्षे आमच्यावर प्रेम केलं आहे. त्यामुळे त्यांच आम्ही काहीतरी देणं लागतो.