पंकजा मुंडेंनी बॅनरवर ‘हा’ उल्लेख टाळावा; शिवसंग्रामने काढले पत्रक

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या बॅनरवर शिवसंग्राम आणि दिवंगत विनायक मेटे यांचा फोटो मित्रपक्ष म्हणून वापरलाय. मात्र यावर आता महावियुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामने शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायक मेटे यांच्या फोटोविषयी आक्षेप घेतला आहे.

    बीड : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या बॅनरवर शिवसंग्राम आणि दिवंगत विनायक मेटे यांचा फोटो मित्रपक्ष म्हणून वापरलाय. मात्र यावर आता महावियुतीचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्रामने शिवसंग्रामच्या नावासह दिवंगत विनायक मेटे यांच्या फोटोविषयी आक्षेप घेतला आहे.

    राज्यात कुठेही महायुतीकडून शिवसंग्राम आणि विनायक मेटे यांच्या फोटोचा वापर किंवा उल्लेख केला गेला नाही. मात्र बीडमध्ये जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांच्याकडून खोडसाळपणे शिवसंग्रामच्या नावासह मेटेंच्या फोटोचा वापर केला जात आहे. बॅनरवर त्यांच्याकडून नाव आणि फोटो टाकला जात आहे. यामुळे याविषयी आमचा आक्षेप आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामच्या नावाचा आणि मेटे साहेबांच्या फोटोचा उल्लेख टाळावा, अशा आशयाचे पत्रकच शिवसंग्रामच्या वतीने काढण्यात आले आहे.

    दरम्यान गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी शिवसंग्राम आणि विनायक मेटे यांचा फोटो टाळला होता. मग आता या नावाचा आणि फोटोचा त्या का वापर करतायत ? हा केवळ खोडसाळपणा आहे. असा गंभीर आरोप करत, त्यांनी नाव आणि फोटो टाळावा. असं यावेळी शिवसंग्राम चे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी म्हटले आहे.