पंकजा-धनंजय बहिण-भावातील राजकीय कटुता कायम?; पंकजा मुंडे परळीतूनच लढणार

गेल्या काही दिवसांपासून मुंडे बहिण-भाऊ यांच्यात कटूता संपून मनोमिलन होणार अशा चर्चा सुरु होत्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या दोन्ही नेत्यांमधील वैर अजून संपले नसल्याचेच दिसत आहे.

    बीड : गेल्या काही दिवसांपासून मुंडे बहिण-भाऊ यांच्यात कटूता संपून मनोमिलन होणार अशा चर्चा सुरु होत्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या दोन्ही नेत्यांमधील वैर अजून संपले नसल्याचेच दिसत आहे. कारण आता पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा भाजपच्या पंकजा विरुद्ध धनजंय ही लढत होईल, असे म्हटले जात आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोन्ही बहिणी-भावामध्ये मनोमिलन होणार असे म्हटले जात होते. तशाप्रकारच्या बातम्याही येत होत्या. पण आता पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. पंकजा मुंडे परळीची जागा सोडून पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला आज स्वतः पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी म्हटले की, ‘माझे समर्थक मला 25 मतदारसंघातून उभे राहा, असे म्हणत आहेत. मात्र, मी माझ्याच मतदारसंघात आहे. अशा अफवा पसवरू नका, असेही त्यांनी सांगितले आहे.

    भाजप प्रदेशाध्यक्षांचं सूचक विधान

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही परिवार एकत्र आले पाहिजे. पंकजा आणि धनंजय यांचे विचार चांगले आहेत. दोघांचे मनोमिलन आमच्यासाठी आनंददायी आहे. पंकजा आणि धनंजय सोबत आले तर आम्हाला अत्यंत आनंद होईल. पण आज-उद्या काहीही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळेही हे दोन्ही नेते एकत्र येतील, असे म्हटले जात होते. पण आता या दोघांचे मनोमिलन होणार नसल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसत आहे.