मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत; पंकजा मुंडे यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

    मुंबई – ”मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत” असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज एका खासगी कार्यक्रमात बोलताना केले. पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.

    पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी पण वंशवादाचे प्रतीक आहे. मला कुणी संपवू शकत नाही. मी जर जनतेच्या मनावर राज्य केले आणि जनतेच्या जीवनासाठी चांगले कार्य केले तर मला मोदीही संपवू शकणार नाहीत. आपल्याला आता राजकारणात बदल करण्याची गरज आहे.

    भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पंकजा मुंडेंचे वक्तव्यातून भाव स्पष्ट होता की, वंशवादाचे राजकारण म्हणजे पिता मुख्यमंत्री आहे म्हणून कर्तृत्व नसताना मुलगा एखाद्या मंत्रीपदावर जातो किंवा पात्रता असो वा नसो कुटुंबातील सदस्यांना पदे मिळतात. त्यांना फेवर केले जात असेल तर नरेंद्र मोदी वंशवादाच्या विरोधात आहेत. जर जनतेने मला निवडून दिले, जनतेने निवडणुकीत स्थान आणि सन्मान दिला तर माझा वंशवादाच्या बाहेर जाऊन जननेता हे प्रतिक मिळु शकते हा अर्थ त्यांच्या वक्तव्यातून प्रतिध्वनित होते.