पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राष्ट्रवादीच्या नेत्याकडून पाठराखण

एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भावना अधिक स्पष्ट करून सांगितली. अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केले असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचे नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतले, हे मला सांगता येणार नाही. पण, मोदींना आव्हान दिले असेल तर ते दुर्दैवी आहे.

    जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनाच आव्हान दिल्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मलादेखील राजकीय वारसा (Political Legacy) आहे. पण कुणा वारशाच्या मदतीने मी राजकारण करते, असे मी म्हणणार नाही. मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी पण वंशवादाचे (Racism) प्रतीक आहे. पण, मोदीजीही मला संपवू शकणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. मात्र, त्यांच्या या बोलण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पाठराखण केली आहे.

    एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भावना अधिक स्पष्ट करून सांगितली. अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केले असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचे नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतले, हे मला सांगता येणार नाही. पण, मोदींना आव्हान दिले असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिले नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, असेही ते म्हणाले.

    पंकजा मुंडे यांनी अनेकवेळा वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली तरी त्या प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत, असे एकनाथ खडसे स्पष्ट केले. पंकजांच्या वक्तव्याची पाठराखण एकनाथ खडसेंनी कशी केली, यावरूनही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.