आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त खारघर टेकडी परिसरात सायकल रॅली आणि जागरूकता अभियान संपन्न

जगभरातील १५ टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्गसंपदेनं संपन्न आहे. केवळ यासाठीच या प्रदेशाचं जतन करणं आवश्यक नाही तर इतर भागातील लोकसंख्येसाठीही पर्वतीय प्रदेश महत्वाचा आहे.

    पनवेल, ग्रामीण – आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त रविवारी ( ता.10) नवी मुंबईची फुफ्फुसे समजल्या जाणाऱ्या खारघर टेकडीवर अनुभूती संस्था, निसर्गमित्र संस्था पनवेल, खारघर वेटलँड हिल्स गृप तसेच पनवेल वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आणि जनजागृती अभियान राबवले गेले, खारघर टेकडीवर होणारे अतिक्रमण, अनिर्बंध क्रशर आणि दगडखाणी, टेकडीवर लागणारे वणवे या सर्वांबद्दल जागरूकता खारघर, पनवेल आणि नवी मुंबईतून सगळे मिळून ४० लोकांनी सायकलिंग करत खारघर टेकडीवर सायकलिंग केले, ह्या रॅलीमध्ये पनवेल वनविभाग, नवी मुंबई पोलीस यांनीही सहभाग घेत जनजागृती साठी मोलाचा हातभार लावला.

    जगभरातील १५ टक्के लोकसंख्या ही पर्वतीय प्रदेशात राहते. तसेच हा प्रदेश विविध प्राणी आणि निसर्गसंपदेनं संपन्न आहे. केवळ यासाठीच या प्रदेशाचं जतन करणं आवश्यक नाही तर इतर भागातील लोकसंख्येसाठीही पर्वतीय प्रदेश महत्वाचा आहे. त्यामुळे पर्वतांच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या विषयी जागरुकता वाढवण्यासाठी ११ डिसेंबर हा दिवस ‘आतंरराष्ट्रीय पर्वत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन या वर्षीची थीम या वर्षी पर्वत दिवस साजरा करताना संयुक्त राष्ट्रसंघटनेनं ‘शाश्वत पर्वतीय पर्यटन’ अशी थीम तयार केली आहे. पर्वतीय प्रदेशातील पर्यटनाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी जगातील राष्ट्रांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघटनेनं केलं आहे.