मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

वाहतूक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी (Collecter) यांनी घेतला आहे.

    रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) मातीसह दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद (Highway Closed) करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे-चिरणी-कळंबस्तेमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे, महामार्गावर वाहनांच्या रांगा (Traffic Jam) लागल्या आहेत.

    परशुराम घाट महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम करण्याच्या दृष्टीने २५ एप्रिल ते २५ मे २०२२ या कालावधीत हा घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक या आधीच्या २२ एप्रिल आदेशाने पूर्णत: बंद करण्यात आली होती. तांत्रिक कारणास्तव याआधीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात आले होते. तर, ३ ते २५ मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती.

    वाहतूक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी (Ratnagiri Collecter) यांनी घेतला आहे.