परशुराम घाट १ ऑगस्टपासून सर्वांसाठी खुला होणार

जोरदार पावसाने घाटात कोसळलेल्या दरडी, माथ्यावरील डोंगराला गेलेल्या भेगा यामुळे घाटातील प्रवास धोकादायक बनला होता. त्यामुळे प्रशासनाने मागील महिन्यात दहा दिवस हा घाट पूर्ण बंद ठेवला; मात्र १३ जुलैपासून सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत अवजड वाहनांसाठी हा घाट सुरू करण्यात आला आहे.

    चिपळूण : दरडींमुळे पावसाळ्यात धोकादायक बनलेल्या आणि दिवसा केवळ अवजड वाहनांसाठी (Heavy Vehicle) सुरू केलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) परशुराम घाटात (Parshuram Ghat) सध्या सर्वच प्रकारची वाहतूक (Transportation) सुरू झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने दरडींचा धोका (Risk Of Cracks) टळल्याने प्रशासनाकडून परवानगी नसतानाही वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. पाऊस कमी झाल्यास १ ऑगस्टपासून घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे.

    जोरदार पावसाने घाटात कोसळलेल्या दरडी, माथ्यावरील डोंगराला गेलेल्या भेगा यामुळे घाटातील प्रवास धोकादायक बनला होता. त्यामुळे प्रशासनाने मागील महिन्यात दहा दिवस हा घाट पूर्ण बंद ठेवला; मात्र १३ जुलैपासून सकाळी ६ ते रात्री ७ पर्यंत अवजड वाहनांसाठी हा घाट सुरू करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरल्याने घाटात दरडींचा धोकाही कमी झाला आहे. परिणामी घाटात अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकीस्वारही बिनधास्तपणे प्रवास करू लागले आहेत.

    परशुराम घाटातून हलक्या वाहनांना प्रवास करण्यासाठी परवानगी दिली गेलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
    कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवर घाटात कंत्राटदार कंपन्यांकडून ६ दरडप्रवण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शिवाय फ्लडलाईटसह आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीही २४ तास दोन्ही बाजूने तैनात आहे. पाऊस कमी राहिल्यास १ ऑगस्टपासून हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.