
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज २०२३ स्पर्धेत परी हेंगळे, वैष्णवी नागोजी, आयुश्री तरंगे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सहाव्या मानांकित परी हेंगळेने दुसऱ्या मानांकित अवनी देसाईचा ६-४ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित वैष्णवी नागोजीने रेवा भातखळकरचा ६-२ असा तर. तिसऱ्या मानांकित आयुश्री तरंगेने ओवी मारणेचा ६-१ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : १२ वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
वाण्या अगरवाल(१) वि.वि.स्वरा पवार ६-२;
ओवी मारणे(३) वि.वि.शरण्या सावंत ६-२;
रेवा भातखळकर वि.वि.गीतिका पावसकर ६-५(५);
रिशीता यादव वि.वि.सान्वी लाटे ६-२;
१२ वर्षांखालील मुले :
अधिराज दुधाने(१) वि.वि.लव परदेशी(८)६-४;
सुजित कीर्थन(१६)वि.वि.पार्थ दाभीकर(५) ६-३;
वीर जोशीलकर वि.वि.रेयांश गुंड(१४) ६-४;
आर्यन बॅनर्जी(२) वि.वि.अनय सुमंत(७) ६-१;
१४ वर्षांखालील मुले:
नीरज जोर्वेकर(१)वि.वि.अंशुल पुजारी(८) ६-५(१);
अनिश वडनेरकर(१३) वि.वि.आर्यन बॅनर्जी(११) ६-२;
नीव गोगिया वि.वि.सर्वज्ञ सरोदे(३) ६-२;
अथर्व येलभर(२)वि.वि.आश्रित मज्जी(६) ६-२;
१४ वर्षांखालील मुली:
वैष्णवी नागोजी(१) वि.वि. रेवा भातखळकर ६-२;
अयाती तुडयेकर(४) वि.वि.मृदुला साळुंके(८) ६-३;
आयुश्री तरंगे(३) वि.वि.ओवी मारणे ६-१;
परी हिंगळे(६) वि.वि.अवनी देसाई(२)६-४.