आठ गावांचा साखळी उपोषणात सहभाग !

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळ्यातील साखळी उपोषणात आठ गावांनी सहभाग दर्शविला आहे.दरम्यान,उपोषणकर्ते टाळ-मृदंगाचा गजर करित भजनामध्ये तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    खंडाळा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळ्यातील साखळी उपोषणात आठ गावांनी सहभाग दर्शविला आहे.दरम्यान,उपोषणकर्ते टाळ-मृदंगाचा गजर करित भजनामध्ये तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
    मनोज जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देत, तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने खंडाळा शहरात असणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारावर साखळी उपोषण सुरु केले आहे.बुधवारी कर्नवडी,साळव, कण्हेरी,असवली,पारगांव,अजनूज, वहगांव,केसुर्डी या आठ गावातील समाज बांधवांनी तिसऱ्या दिवशी ठिय्या मांडला असून उपोषणाला वाढता पाठीबा मिळत असल्याचे दिसून येते.तर सकाळी विविध गावातील उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर उपोषणकर्ते टाळ-मृदंगाचा गजर करित भजना मध्ये तल्लीन झाल्याचे चित्र उपोषणस्थळी पाहायला मिळाले.