पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात; कणकवली येथे विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

शुभ बोलणाऱ्यांनी मला अडविण्याची आणि धमकीची भाषा वापरु नये - विनायक राऊत

    कणकवली : कणकवलीत माझ्या वडिलांचे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरून मते मागत आहेत. मोदी-शहा यांनी आपल्या वडिलांचे नाव वापरून मते मागावित. भाजप हा बेअकली पक्ष आहे. मोदी-शहा यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास मोदी-शहा यांनी लुटलेले सर्व वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शुभ बोल नाऱ्याने मला अडविण्याची आणि धमकीची भाषा वापरू नये, तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. 2024 लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपाला जनता राजकीयदृष्ट्या तडीपार करेल. महाराष्ट्रातील जनता मशालीची धग काय असते ती भाजपला दाखवून देईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. संविधान बदलण्याचा भाजपचा डाव असून त्यांचा हा डाव देशवासीयांनी हाणून पाडावा, असे आवाहन त्यांनी केले. मोदी, शहा, राणे आणि भाजपवर ठाकरे शैलीत हल्लाबोल केला. मोदी, अमित शहांनी आपल्या सभांमध्ये बाळासाहेब नव्हे तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नावाचा उल्लेख करावा असा करावा, असा इशारा ठाकरेंनी दिला.

    कोणाला धमक्या देतो, चल गेट आऊट बाळासाहेबांनी केलं. रमेश गोवेकर, अंकुश राणे कुठे गेले, या हत्या झाल्या कशा? जो जो भाजपात गेला तो धुतला गेला का? पण लोकांच्या मनात आजही शिवसेना आहे. मी आणि हमारे दो…या घराणेशाहीचे काय? अमित शहा तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. माझे वडिलांचे नाव लावून निवडणूक जिंकण्यापेक्षा तुमच्या वडिलांचे नाव लावा. महाराष्ट्राच्या विरोधात याल, याद राखा. तुम्ही घेत असलेला आकसाचा सुड घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात समोरील मैदानावर शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री यांची जाहीर सभा आयोजित केली होती. याप्रसंगी श्री. शिवसेनेचे नेते तथा आमदार अनिल परब, शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेनेचे नेते अरविंद भोसले, उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहाय्यक मिलिंद नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, माजीमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काॅग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोकण विभागीय संघटक अर्चना घारे परब, सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत-पालव, जान्हवी सावंत, प्रदीप बोरकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, नीलेश गोवेकर, डाॅ. प्रथमेश सावंत यांच्या महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

    उद्धव ठाकरे म्हणाले, खतावरती मोदींचा फोटो का? शेतकऱ्यांना ६ हजार येत आहेत, खतावर, बि बियाणे, कीटकनाशके यावर जीएसटी रद्द करणार आहे. गुजरातला हक्काचे आहेत ते देवू, पण राज्य ओराबडू देऊन नाही. चिपी विमानतळ आता चालू आहे की बंद आहे? आम्ही मागे लागून सुरु केला, आता काय? मोदी, शहा आमचे प्रकल्प पळवलात. मुंबईचे वित्तीय केंद्र गुजरातला नेलं ते परत आणीन. बार आपटले तरी अबकी बार..अशी घोषणा केली जाते. ३० वर्षानंतर एका पक्षाचे सरकार आले. ३०० खासदार आले त्याचे पुन्हा २ खासदार येऊ शकतात. कलावती यांचे घर राहुल गांधी यांनी दिले, मात्र, अमित शहा लोकसभेत सांगत आम्ही घर दिले. ते उघड झाले. महागाईचा कहर झालं आहे. गेल्यावेळी माझी चूक झाली, मी महाराष्ट्राची माफी मागतो. फोडाफोडी राज्यात केली जाते, यांचा संताप आहे. संकट आमच्यावर नाही तर तुमच्यावर आहे. गोमूत्र धारी हिंदुत्व हे भाजपाचे आहे. गरीब कुटुंबातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली घटना बदलाची आहे. धनुष्य बाण कोकणच्या मनातून काढून टाकायचा प्रयत्न आहे.