३४ विद्यार्थ्यांची मॅग्ना कंपनीत नोकरीसाठी निवड

अहमदनगर: पाॅलीटेक्निक मधील विध्यार्थ्यांना पदविका अभ्याक्रम पुर्ण करताना त्यांच्यात उद्योग जगताला अभिप्रेत असणारे कौशल्ये व अद्ययावत ज्ञानाची रूजवण झाल्यास त्यांना चांगल्या कंपन्या लागलीच नोकऱ्या देतात.

अमित कोल्हे यांची माहिती


अहमदनगर: पाॅलीटेक्निक मधील विध्यार्थ्यांना पदविका अभ्याक्रम पुर्ण करताना त्यांच्यात उद्योग जगताला अभिप्रेत असणारे कौशल्ये व अद्ययावत ज्ञानाची रूजवण झाल्यास त्यांना चांगल्या कंपन्या लागलीच नोकऱ्या देतात. अलिकडेच पुणे येथील मॅग्नाऑटोमोटीव्ह इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीला डीप्लोमा इंजिनिअर्स हवे होते. मुळातच संजीवनी केबीपी पाॅलीटेक्निकचे नाव उद्योग जगतात चांगले असल्यामुळे कंपनीने थेट पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाशी संपर्क साधुन डिप्लोमा इंजिनिअर्सची मागणी केली. होकार देताच कंपनीने ऑनलाईन मुलाखती घेवुन ३४ नवोदित डिप्लोमा इंजिनिअर्सची आकर्षक पगारावर डायरेक्ट पे रोलवर निवड आहे,अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्सि्टटयूटसचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
अमित कोल्हे म्हणाले की, कोविड १९ च्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना दैनंदिन खर्च आणि जबाबदाऱ्या कशा सांभाळाव्या या चिंतेने ग्रासले आहे. समाजातील सर्वच गटातील लोकांना कोरोना व्हायरसच्या महामारीने आर्थिक मेटाकुटीस आणले. निवउ झालेले बरेचसे  विध्यार्थी  शेतकरी कुटूंबातील आहेत. अशा परीस्थितीमध्ये कोविड १९ च्या अगोदर व लाॅकडाउनच्या काळातही संजीवनीने गरजु अभियंत्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. आलिकडेच मॅग्ना अटोमोटिव्ह इंडिया प्रा.लिमिटेड या मुळच्या कॅनडाच्या बहुराष्ट्रीय कंपनीने पुणे येथील प्लॅन्ट साठी ३४ विद्यार्थ्यांची निवड केली.