कृषीमंत्री दादा भुसे यांनी घेतली आमदार महेश शिंदेंची उपोषणस्थळी भेट

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची सदोष मीटरमुळे वीज बिले भरमसाठ येत असून, शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. याप्रश्नी महेश शिंदे (Mahesh Shinde) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (दि.२३) विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

    विसापूर : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची सदोष मीटरमुळे वीज बिले भरमसाठ येत असून, शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. याप्रश्नी महेश शिंदे (Mahesh Shinde) आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात गुरुवारी (दि.२३) विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

    कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची सदोष मीटरमुळे वीज बिले जादा येत आहेत. खराब दर्जाच्या ट्रान्सफॉर्मरमुळे व फॉल्टी मीटरमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. ट्रान्सफॉर्मरचा दर्जा इतका निकृष्ट आहे की तो बसवला की एका दिवसातच खराब होत आहे. अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यातच या महावितरणच्या भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पीके भुईसपाट होत आहेत. या संदर्भात महेश शिंदे यांनी आवाज उठवला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वातावरण आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने महेश शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे.

    महावितरणच्या या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची वीज जोडणी थांबवा. सामान्य ग्राहकांची वाढीव वीज बिलातून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी महेश शिंदे यांनी केली. याबाबतचे निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिले आहे.

    महेश शिंदे यांनी कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनात पोहोचवला. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आमदारांचे कौतुक होत आहे, असे युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.