सण उत्सव साजरे करताना रुग्ण संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी: दिलीप वळसे पाटील

भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी मोठया उत्साहात संपन्न केला जातो. पण यावेळी कोरोनाच्या जागतीक महामारीमुळे हा ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन लहान पध्दतीने साजरा केला जात आहे. दि. २२ रोजी गणेशोत्सव सुरू होत असल्याने त्याचेवरही मर्यादा आहे.

भिमाशंकर :  भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी मोठया उत्साहात संपन्न केला जातो. पण यावेळी कोरोनाच्या जागतीक महामारीमुळे हा ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन लहान पध्दतीने साजरा केला जात आहे. दि. २२ रोजी गणेशोत्सव सुरू होत असल्याने त्याचेवरही मर्यादा आहे. त्यामुळे आपण सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा आणि आपल्यामुळे रूग्ण संख्येत वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.   

तहसिल कार्यालय आंबेगाव येथे झेंडावंदन कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी प्रांत व आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, पंचायत समिती सभापती संजय गवारी, कैलासबुवा काळे, संतोष भोर, अक्षय काळे, भानुदासनाना काळे, किरण घोडेकर, ज्ञानेश्वर घोडेकर आदि मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उदयोग धंदे, कामगार वर्ग, शैक्षणिक संस्था आदि सर्व अडचणीत आले आहे. यासाठी सर्वांनी मिळून या संकटाशी सामना करायचा आहे. केंद्र व राज्य सरकार आपल्या पध्दतीने काम करत आहे. विविध संस्था, लहान-मोठे सर्व घटक यांच्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग आपल्या परिसरात काही अंशी नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे परंतु लढाई मोठी आहे. आता लॉकडाऊन उठले आपण कसेही वागू असे करून नका. यामुळे आपल्या जिवाला धोका असू शकतो व आपल्यमुळे इतरांनाही धोका होऊ शकतो यासाठी आपण काळजी घ्यावी, असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.