गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळेस गर्दी न करण्याचे आवाहन

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रसार होईल.

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येऊन कोरोनाचा प्रसार होईल.असे वर्तन न करता शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे नागरिकांनी घरचे गणपती घरीच विसर्जन करावे.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने व्यवस्था केलेल्या टँकरमध्ये आपली गणेशमुर्ती देऊन विसर्जनासाठी सहकार्य करावे.असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे.

मंचर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत तहसिलदार रमा जोशी बोलत होत्या.यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे,जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात,पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले,मंचरचे प्रशासक जयराम लहामटे,माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले,अरुणनाना बाणखेले,रंगनाथ थोरात,दत्ता थोरात,राजू इनामदार,अल्लू इनामदार,संदीप बाणखेले,लक्ष्मण थोरात-भक्तेपाटील,उद्योजक नितीन भालेराव,ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.गणेश विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते व प्रशासन यांची बैठक आयोजित केली होती. यावर्षी कोरोना साथीमुळे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला नसला तरी गणेशमुर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये.असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

शहरात अधिक रुग्ण असून ५२ कंटेनमेंट झोन आहेत.या सर्व परिसरात कोरोना प्रसार होऊ शकतो.यामुळे प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहाय्याने प्रत्येक प्रभागांमध्ये दहा ते बारा स्वयंसेवक नेमून गणेशमुर्ती विसर्जनाची तयारी केली आहे.स्वयंसेवकामार्फत आपले गणपती घरीच आरती घेऊन विसर्जनासाठी स्वयंसेवकाच्या ताब्यात देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहेत.पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले मंचर येथे गणेश विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागानुसार मंचर पोलीस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या वतीने गणेश विसर्जनासाठी स्वयंसेवक नेमणूक करणे आहे.ज्या तरुणांना या कार्यात भाग घ्यायचा आहे.त्यांनी मंचर पोलीस ठाणे अथवा ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधावा.  तसेच गणेशमुर्ती विसर्जनासाठी कळंब येथील घोडनदी घाटावर कुणीही जाऊ नये.असे आवाहनही त्यांनी केले.