सातवे पैकी शिंदेवाडी येथील गॅस्ट्रोची साथ नियत्रंणात, सर्वच रूग्णांची प्रकृती स्थिर : डॉ. सोनिया कदम

गॅस्ट्रोमुळे शिंदेवाडी येथील ५ तर ऊसतोड मजुरातील २६ रूग्ण बाधीत झाले होते. यातील प्रकृती चिंताजनक बनलेल्या १२ रूग्णांना पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. यातील एका महिला रूग्णास धरी सोडण्यात आले आहे. इतर ११ रूग्णांची तसेच स्थानिक पातळीवर उपचार सुरू करून बरे केलेल्या सर्वच रूग्णांची प्रकृती स्थिर व चांगली आहे.

  वारणानगर : सातवे पैकी शिंदेवाडी ता. पन्हाळा येथील गॅस्ट्रोची साथ नियत्रंणात आली असून, उपचारात असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बोरपाडले प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम यानी दिली.

  शिंदेवाडी येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ दोन दिवसांपूर्वी उद्भवली होती. यामध्ये २६ डिसेंबरला रात्री पहिला रूग्ण ४ वर्षाची बालिका रितू सुरेश पावरा सापडल्यावर तिचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ सोमवारी (दि.२७) राजश्री राजेश पवार या महिलेचा मृत्यू झाल्यावर बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्र व सातवे येथील जिल्हा परिषदेचे आरोग्य पथकाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा गतीने राबवत गॅस्ट्रोची साथ नियत्रंणात आणण्यात यश आले.

  गॅस्ट्रोमुळे शिंदेवाडी येथील ५ तर ऊसतोड मजुरातील २६ रूग्ण बाधीत झाले होते. यातील प्रकृती चिंताजनक बनलेल्या १२ रूग्णांना पुढील उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. यातील एका महिला रूग्णास धरी सोडण्यात आले आहे. इतर ११ रूग्णांची तसेच स्थानिक पातळीवर उपचार सुरू करून बरे केलेल्या सर्वच रूग्णांची प्रकृती स्थिर व चांगली आहे.

  शिंदेवाडीतील पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीतील स्वच्छता व योग्य त्या औषध प्रक्रिया केल्या आहेत तसेच हे पाणी तपासणीसाठी पाठवले आहे. शिंदेवाडीतील घर टू घर भेटी देवून नागरिकांची तपासणी तसेच संदर्भ औषधांचा पुरवठा केल्याचे डॉ. सोनिया कदम यानी सांगितले.

  शिंदेवाडीत आज देखील ऊस तोड मजूराचे पाच रूण बाधीत सापडले आहेत. यामध्ये हिरदेस जगन पावरा (3 वर्षे), गुरुदेव सुरेश पावरा (दीड वर्षे), ऋतू बालु पावरा (३ वर्षे), जितेन बालू पावरा (४ वर्षे), अनिता बालु पावरा (१ वर्षे), आरती कैलास पावरा (३ वर्षे), विद्या ताराचंद पावरा (दीड वर्ष) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य पथकाचे समुदाय आरोग्य अधिकारी संदीप जाधव, आकाश घाटगे यासह सर्व कर्मचारी दोन दिवस अहोरात्र काम करीत असून, आज आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, साय रोग नियत्रंण अधिकारी डॉ. संतोष तावशे, डॉ. शुभांगी रंदाळकर यानी घटनास्थळी भेटी देवून परिस्थितीची पाहणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

  शिंदेवाडीतील पाणी दूषित नाही : सरपंच अमर दाभाडे

  शिंदेवाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरीतील तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी दूषित झालेले नाही, अशी माहिती मोबाईलवर पाणी तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या अधिकारी यांनी कळवल्याचे सरपंच अमर दाभाडे यानी सांगितले.