covid hospital

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोर प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. कोरोना बाधितरुग्णांना भोर मध्येच उपचार मिळावेत यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे सर्व सुविधांसह कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे, अशा सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या होत्या.

राजेंद्रकुमार जाधव यांची माहिती

भोर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोर प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. कोरोना बाधितरुग्णांना भोर मध्येच उपचार मिळावेत यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे सर्व सुविधांसह कोविड केअर सेंटर तयार करण्यात यावे, अशा सूचना आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या होत्या. त्यानुसार भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केले आहे, असे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.

– १०० लोकांचे स्वॅब तपासले जाणार

भोर तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे उपस्थित होते.

तालुक्‍यातील बाधित रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधांनी युक्त ५० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार केले आहे. भोर येथील राजगड ज्ञानपीठाच्या मुलींच्या वसतिगृहात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कातील १०० लोकांचे स्वॅब तपासले जातील, अशी व्यवस्था तेथे केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथेही ५० खाटांचे नियोजन केले आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय बामणे तर आयटीआय येथील रुग्णांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जात आहेत. रुग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग प्राथमिक शिक्षक भवन येथे सुरू केला आहे.