सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी

    अकलूज : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च, शंकरनगर – अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि . १८/०८/२०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
    नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी निमीत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपले विचार व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगीतले तसेच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली व तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा असा नारा दिल्याचे सांगीतले . महाविद्यालयामध्ये थोर महापुरूषांच्या जयंती तसेच पुण्यतिथी साजरी करण्यामागे आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी हा उद्देश असतो असतो तरी सर्व विद्यार्थ्यांनी या थोर महापुरूषांचा आदर्श घ्यावा असे सांगीतले