नगर जिल्हा परिषद मुख्यालय ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकार्याचा व एका कर्मचार्याचा कोरोना मुळे मृत्यु झाला. तसेच जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मागील आठवड्यात काही दिवस व आता पुढील संपूर्ण आठवडा जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना संक्रमण वेगाने वाढत असल्याने घेतला निर्णय
अहमदनगर: अहमदनगर जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकार्याचा व एका कर्मचार्याचा कोरोना मुळे मृत्यु झाला. तसेच जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाने मागील आठवड्यात काही दिवस व आता पुढील संपूर्ण आठवडा जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकार्याच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषदे त श्रध्दांजली अर्पण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 आरोग्य खात्यातील आपले सहकारी बंधू- भगिनी क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्षात या कोरोनशी लढा देत आहेत त्यांनी सुध्दा आवश्यक ती सर्व काळजी घेण महत्वाच आहे.आपण स्वत:  सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवा,असे आवाहन जिल्हा परिपषदेतील सुभाष कराळे यांनी केले आहे.  
श्रध्दांजली वाहण्यासाठी शब्द न सुचावे अशीच काहीशी परिस्थिती आपली सर्वांची झाली आहे. आपल्यातला एक उमदा सहकारी आपण गमावून बसलो आहोत. या आठवडाभरात एक वरिष्ठ अधिकारी आणि सोमवारी आपला सहकारी. सर्व काही एक क्षणात नि:शब्द…..या सर्व परिस्थितीत अधिकारी, पदाधिकारी आणि आपण सर्व कर्मचारी काहिसे धास्तावलो आहोत हे मात्र खरं आणि त्यामुळेच मागील आठवड्यात एखादा दिवस सोडता पूर्ण आठवडा आणि हा संपूर्ण आठवडा जि. प. चे मुख्यालय बंद बाबतचा निर्णय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने घेतला आहे. ही वेळ अशी आहे की आपण आणि आपले कुटूंब आपला परिवार सर्व जण महत्वाचे घटक आहोत. यापेक्षा सर्वोच्च काहीच नाही.आपण सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित.त्यामुळे आपण सर्वानी आपली आणि सुरक्षित अंतर ठेवून आपणा सर्वाची एकमेकांची काळजी घेण हेच महत्वाच आहे. ज्याप्रमाणे एखाद्या अवघड गोलंदाजा ची गोलंदाजी खेळून काढण महत्वाच आहे तसेच या अवघड काळात आपण खचू न न जाता काळजी घेण महत्वाच आहे.