बळीराजा नवीन वर्षाचे स्वागत काळा दिवस म्हणून करणार : पंजाबराव पाटील

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार (दि.२३) शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

    कराड : बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार (दि.२३) शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

    प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या, शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत आहे. परंतु, सरकारला त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ नाही. यासाठी गुरुवार दि. डिसेंबर रोजी आझाद मैदान (मुंबई) येथे शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकून घेतले नाही. याचा निषेध म्हणून बळीराजा शेतकरी संघटना राज्यातील आघाडी सरकारचा एक जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी काळा दिवस साजरा करून निषेध नोंदवणार आहेत.

    त्यानुसार राज्यभरातील शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२२ रोजी आपल्या गावात एकत्र जमून महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करावा, असे आवाहनही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील यांनी केले आहे.