महिलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा गौरी सण

इंदापूर शहरातील भाग्यश्री पाटील बंगला येथे गौरी सणानिमित्त ( ganesh gauri festival) पर्यावरणपूरक संदेश (Eco-friendly message) देणारा आकर्षक सजावटींसह सुंदर देखाव्याचा आरास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व कन्या अंकिता पाटील यांनी साकारला असुन यामधुन वेगवेगळे पर्यावरनाविषयीचे संदेश देण्यात आले आहेत.

भाग्यश्री पाटील यांची भावना

इंदापूर : इंदापूर शहरातील भाग्यश्री पाटील बंगला येथे गौरी सणानिमित्त ( ganesh gauri festival) पर्यावरणपूरक संदेश (Eco-friendly message) देणारा आकर्षक सजावटींसह सुंदर देखाव्याचा आरास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व कन्या अंकिता पाटील यांनी साकारला असुन यामधुन वेगवेगळे पर्यावरनाविषयीचे संदेश देण्यात आले आहेत. तर गौरी वर्षभर सासरी राहून फक्त अडीच दिवस माहेरी म्हणजे आपल्या घरी येते अशी गौरी भक्तांची धारणा असल्याने महिलाच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा हा सण असल्याचे मत भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

हळदी कुंकवाचे लेणं घेऊन गौरी आली… गौरी आली असे म्हणत गौरीचे इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी मंगळवार दिनांक २५ रोजी सायंकाळी स्वागत करण्यात आले. गौराईचे मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली.व सायंकाळी भाजी भाकरीच्या नैवद्य देण्यात आला.तर दुसर्‍या दिवशी बुधवारी पुरण पोळीचा नैवद्य देवुन गौरायांचे स्वागत करण्यात आले. ‘अतिथी देवो भव’ या उक्तीनुसार प्रत्येक कुटूंबात आपल्याकडील गौरीसाठी फराळ, विविध देखावे, दिवाबत्ती ,पुजा ,नैवेद्य, आणि धन धान्याच्या राशी समर्पित करून आपल्या कुटुंबावर वर्षानुवर्षे कृपादृष्टी लाभावी,यासाठी मनोमना प्रार्थना करीत असतात. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जात असल्याचे भाग्यश्री पाटील व अंकिता पाटील यांनी सांगितले.