पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी आरोपी भारत कमलाकर जाधव (वय 27 रा. प्रतापगंज पेठ) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी हे सोमवारी आदेश दिले.

    सातारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी आरोपी भारत कमलाकर जाधव (वय 27 रा. प्रतापगंज पेठ) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी हे सोमवारी आदेश दिले.

    या खटल्याची माहिती अशी आरोपी भारत जाधव याने 27 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान पत्नी श्रद्धा हिचा चारित्र्याच्या संशयावरून भांडणादरम्यान धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केला होता.

    या प्रकरणी आरोपी जाधव याला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अटक केली . या तपासा दरम्यान धुमाळ पोलीस हवालदार श्रीनिवास देशमुख व अतिश घाडगे यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन एल मोरे यांच्या दालनात झाली.

    या प्रकरणी एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेली निर्भिड साक्ष, परिस्थितीजन्य शास्त्रोक्त पुरावे व सरकार वकील महेश कुलकर्णी यांनी भक्कमपणे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे शुभांगी भोसले, शमशुद्दीन शेख, जी. एच. फरांदे, राजेद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी या सदर खटल्यासंदर्भात विशेष सहकार्य केले.