file image
file image

  • कोल्हापूर शहरात काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाचा जोर कायम आहे. सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली गेल्याचे समजते. तर, अनेक गावांचा संपर्क आता तुटला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने येथील लोकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच राधानगरी धरणाची पातळी उच्चांक गाठत असल्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे  नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्यानं जिल्ह्यातील १०२ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोल्हापूर शहरात काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाचा जोर कायम आहे. सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली गेल्याचे समजते. तर, अनेक गावांचा संपर्क आता तुटला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे ४० पेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कोल्हापुर-रत्नागिरी, कसबा बावडा-शिये, कुरुंदवाड-शिरढोण, केर्ली या मार्गांवर पाणी आले असून हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.