पतसंस्‍थेच्‍या सभासदांना १२ टक्‍के डिव्हिडंड जाहीर; ‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्‍था ऑनलाइन संभा

    कोल्हापूर : ‘गोकुळ सलग्‍न’ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या., कोल्‍हापूर या संस्‍थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने घालून दिलेल्‍या नियमानुसार ऑनलाइन पध्‍दतीने संस्‍थेच्‍या कार्यालयात चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. चेअरमन आसुर्लेकर यांनी संस्‍थेच्‍या अहवाल सालातील प्रगतीचा आढावा सभेपुढे वाचन केला.

    सध्‍या संस्‍थेचे वसूल भाग भांडवल २१.४७ कोटी, ठेवी ३२.१० कोटी, कर्जे  ६७.५३ कोटी, चालू नफा १६.०३ लाख, खेळते भांडवल ६९.८० कोटी असून, वार्षिक उलाढाल १३१ कोटी इतकी झाली आहे. संस्‍थेने २०१९-२०२० सालातील शेअर्स रक्‍कमेवर १२ टक्‍के डिव्‍हिडंड देण्याचे जाहीर केले व विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना खेळीमेळीत चर्चो विनिमय होऊन मंजुरी देण्यात आली. ऑनलाइन सभेस सभासदांनी मोठ्या संख्‍येने भाग घेतला.

    यावेळी आभार संस्‍थेचे सहा.व्‍यवस्‍थापक संभाजी माळकर यांनी मानले. याप्रसंगी संस्‍थेचे चेअरमन प्रकाश आसुर्लेकर, व्‍हा. चेअरमन सतिश मदने, संचालक नंदकुमार गुरव, शिवाजी पाटील, परशुराम पाटील, सुनिल घाटगे, राजेंद्र पाटील, संभाजी देसाई, गणपती कागणकर, संचालिका शुभदा पाटील, छाया बेलेकर, संस्‍थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.