बरगेवाडी शेतातील झाड पडून एकाच जागीच मृत्यू; तर एक जण गंभीर

  कोल्हापूर : बरगेवाडी (ता. राधानगरी) येथे शेतातील झाड ताेडताना अंगावर  झाड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. दौलत मसू लोहार (वय ६८ रा. कौलव) असे मृताचे नाव असून श्रीपती गणू पाटील -बेलेकर (रा.बरगेवाडी)असे जखमीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी दौलत हे सुतारकाम करीत हाेते.
  एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर
  शुक्रवारी दुपारी तीन वाजता ते बरगेवाडी येथील शेतातील झाड ताेडण्यासाठी गेले हाेते. त्यांच्यासाेबत  अन्य चारजण हाेते. झाड तोडतेवेळी  झाडाला दोरी बांधून ते ओढत असताना ते अचानक दौलत लाेहार यांच्या अंगावर पडले.झाड माेठे असल्याने अंगावर पडल्यानंतर  दौलू लोहार यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी बरगे यांनी उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले.
  परिसरात शोकाकुल वातावरण
  शवविच्छेदनानंतर रात्री काैलव येथे दौलू लाेहार यांच्यावर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात लोहार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
  झाड पडल्याने डोके छिन्नविच्छन्न
  झाड एवढ्या वेगाने दौलू लोहार यांच्या अंगावर पडले की त्यांना बचावासाठी पळायचीही संधी मिळाली नाही. हा अपघात एवढा भीषण हाेता की लाेहार यांचे डोके छिन्नविच्छिन्न होऊन डोक्यापासून खालील शरीराची दोन भाग झालेले होते.