मामाला फराळ देण्यासाठी गेला होता, ट्रॅक्टरची बसली धडक अन् होत्याचं नव्हतं झालं…

दिवाळीच्या सणासाठी भाऊबीजेच्या दिवशी मामाला फराळ घेऊन आला होता, हौसेने मामाने त्याला कुरवाळलेही असेल आणि तो फराळ देऊन आपल्या गावी जात होता, आणि ट्रॅक्टर चालकाच्या बेफिकिरीमुळे त्याची मोटारसायकल उसाचे ट्रॅक्टरला धडकली आणि होत्याचे नव्हते झाले.

    गारगोटी : दिवाळीच्या सणासाठी भाऊबीजेच्या दिवशी मामाला फराळ घेऊन आला होता, हौसेने मामाने त्याला कुरवाळलेही असेल आणि तो फराळ देऊन आपल्या गावी जात होता, आणि ट्रॅक्टर चालकाच्या बेफिकिरीमुळे त्याची मोटारसायकल उसाचे ट्रॅक्टरला धडकली आणि होत्याचे नव्हते झाले. ऐन भाऊबीजेदिवशी २० वर्षीय महेश कायमचा निघून गेला. हा अपघात भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावाजवळ घडला.

    महेश मधुकर सावंत (रा. वेसर्डे, ता भुदरगड) असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. ऐन सणादिवशीच हातातोंडाला आलेले मुलगा गमावण्याची वेळ या कुटूंबावर आलेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत महेश हा दिवाळी सणाचा फराळ घेऊन आपल्या मामाचे गावी करडवाडी (ता. भुदरगड) येथे आला होता. तो दूचाकीवरुन (एमएच०९ सीआर ६०७) करडवाडीहून आपल्या गावी जात हाेता.

    घरची परिस्थिती हलाकीची

    भुदरगड तालुक्यातील गारगोटी-पाटगाव रस्त्यावर पाचर्डे गावच्या हद्दीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची दूचाकीला धडक बसली. या अपघातात महेश मधुकर सावंत गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता त्यास गारगोटीच्या ग्रामीण रुग्णलयात हलवणेत आले असता मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयत सावंतची घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यांच्या मागे आई व भाऊ आहे. पोलीस उपनिरिक्षक सतिश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.