संजय घोडावत विद्यापीठामध्ये अ‍ॅडजंट फॅकल्टी म्हणून परदेशातील नामवंत प्राध्यापकांची नियुक्ती

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे. या सर्व व्यक्तीकडून येथील विद्यार्थी व प्राध्यापकांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन मिळणार आहे

    शिरोली : संजय घोडावत विद्यापीठामध्ये परदेशातील नामवंत विद्यापीठातील प्राध्यापक व वैज्ञानिक यांची अ‍ॅडजंट फॅकल्टी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. यामध्ये अमेरिकेतील सॅनजोश स्टेट युनिव्हर्सिटीच्या ऐरोस्पेस इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. निकोस मार्तोस, न्यूझीलंड येथील ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी चे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. गाय लिट्लफेअर, ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्कुल ऑफ सायन्स चे डीन प्रा. ऍलेक्स स्टोजेसव्हस्की, युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न च्या क्लाऊड कम्प्युटिंग डिस्ट्रीब्युटेड लॅब चे संचालक डॉ. राजकुमार बुय्या, सायबर सिक्युरिटीमधील जागतिक तज्ज्ञ श्री. आशुतोष कापसे , मोनॅश विद्यापीठाच्या मटेरियल सायन्स क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ.दीपक डांगे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मारी क्युरी फेलो वैज्ञानिक डॉ.नानासाहेब थोरात, डिकीन विद्यापीठाचे डॉ. आरंगराज विनयगम यांचा समावेश आहे.

    याबद्दल बोलताना कुलगुरु डॉ.अरुण पाटील म्हणाले ” या सर्व व्यक्ती परदेशातील नामवंत विद्यापीठात त्यांच्या क्षेत्रात मातब्बर असून भविष्यात त्यांच्या सहयोगाने घोडावत विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे. या सर्व व्यक्तीकडून येथील विद्यार्थी व प्राध्यापकांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन मिळणार आहे”.विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी निवड झालेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.