थकीत मानधनासाठी शाहूवाडीतील आशा स्वयंसेविकांचे आमदार डॉ. विनय कोरे यांना निवेदन 

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत महिलांचे आरोग्य, प्रसुति, लसीकरण, शालेय पोषण आहार, इत्यादी माहितीचे संकलन, अशी अनेक कामे आशा स्वयंसेविका न थकता अविरतपणे करत असतात.  या साथीच्या रोगाच्या काळात काम करून सुद्धा आशा स्वयंसेविकांना मानधनासाठी संघर्षाचा मार्ग अवलंबावा लागतो. तरी थकीत मानधन लवकरात लवकर मिळावे. व पुढील काळातील मानधन वेळच्यावेळी मिळावे असे निवेदनात म्हटले आहे.

    वारणानगर : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे समाजाचे समाजकारण, अर्थकारण  बिघडून गेले आहे.  या कोरोना रोगाच्या काळामध्येसुध्दा शाहूवडी तील आशा स्वयंसेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन अगदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून कोवीड १९ च्या रुग्णांचे सर्वेक्षण केलं. ही बाब महत्त्वपूर्ण आहे .

    अशा संकटाच्या काळात काम करून  ग्रामपंचायतीकडून आशा स्वयंसेविका यांना मिळणारे मानधन ग्रामपंचायतीकडून वेळेवर मिळत नाही. ते मानधन थकीत आहे. ते थकित असणारे मानधन लवकरात लवकर मिळावे अशा आशयाचे निवेदन शाहूवाडी तील सरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आशा स्वयंसेविका यांनी शाहुवाडी पन्हाळा चे आमदार डॉक्टर विनय कोरे यांना दिले.

    याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत महिलांचे आरोग्य, प्रसुति, लसीकरण, शालेय पोषण आहार, इत्यादी माहितीचे संकलन, अशी अनेक कामे आशा स्वयंसेविका न थकता अविरतपणे करत असतात.  या साथीच्या रोगाच्या काळात काम करून सुद्धा आशा स्वयंसेविकांना मानधनासाठी संघर्षाचा मार्ग अवलंबावा लागतो. तरी थकीत मानधन लवकरात लवकर मिळावे. व पुढील काळातील मानधन वेळच्यावेळी मिळावे असे निवेदनात म्हटले आहे. शाहूवाडीतील आशा स्वयंसेविकांचे थकलेले मानधन लवकरात लवकर मिळावे यासंदर्भात शाहुवाडीचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी तहसीलदार गुरु बिराजदार यांना फोनवरून सूचना दिल्या. यावेळी सरुड प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सर्व अशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.