electricity theft

    हातकणंगले : माणगांव येथील वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष संतोष राजमाने याने विद्युत पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ माणगाव येथील विद्युत वितरण कंपनी उपकेंद्रच्या प्रवेशद्वारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली.

    राजमाने यांचे दोन महिन्यांपूर्वी विद्युत बिल सोळा हजारच्या आसपास थकीत होते. विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी त्याच्याकडून आठ हजारांची वसूली केली होती. पण गेली दोन महिन्यांचे परत त्याची थकबाकी दहा हजार रूपयेपर्यंत राहिलेले होते. सदर थकबाकी भरण्याबाबत विद्युत वितरण कर्मचारी यांनी फोनवरून विनंती केली. पण हे बिल न भरल्याने वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला.

    राजमाने यांना वितरण कंपनीने कोणतेही लेखी नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ माणगाव महावितरण उपकेंद्र येथे ज्वलनशील द्रव अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न करता असताना त्याच्या हातातील काडीपेटी सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य अभिजित घोरपडे, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी प्रशांत जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता काढून घेतला. यामुळे पुढील धोका टळला.