मराठा समाजाचा कोल्हापूरात चक्का जाम ;सरकारच्या नाकर्तेपणाचा केला निषेध

सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. चक्‍का जाम आंदोलनात सर्व मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी राज्‍य सरकारचा कडकडीत निषेध करण्यात आला.

    कोल्‍हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापूरात सकाळी अकरा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत कोल्‍हापुरातील राजर्षी शाहू समाधी परिसरात मूक आंदोलन करण्यात आले हाेते. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत व विविध मागण्यांबाबत राज्य सरकारकडून होणाऱ्या निर्णयावर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली होती. यानंतर राज्‍य सरकारकडून सकल मराठा समाजाच्या प्रमुख सात मागण्या गतीने सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले होते. मात्र, त्‍यावर अंतिम निर्णय होईपर्यंत मूक आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केला होता.

    सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध
    दरम्‍यान सकल मराठा समाज कोल्‍हापूर जिल्‍हा यांच्या वतीने छत्रपती ताराराणी चौकात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.२२) सकाळी अकरा वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. चक्‍का जाम आंदोलनात सर्व मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी राज्‍य सरकारचा कडकडीत निषेध करण्यात आला. जोपयत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या आंदाेलनात समरजित घाटगे, बाबा इंदुलकर,निवासराव साळुंखे, बाबा पार्टे, सुजित चव्हाण, जयकुमार शिंदे, महेश जाधव आदी उपस्थित हाेते.
    या आंदोलनामध्ये समरजित घाटगे, बाबा पार्टे,निवासराव साळोखे,जयंत पाटील,सुजित चव्हाण,अजित राऊत, जयकुमार शिंदे, दिलीप देसाई,जयेश कदम,बाबा इंदुलकर,सचिन तोडकर,कुलदीप गायकवाड,दिलीप पाटील,स्वप्नील पार्टे रूपाराणी निकम, गायञी राऊत,उमा इंगले आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता मराठा समाज बांधव हातात भगवे झेंडे घेऊन आंदोलन ठिकाणी आले यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता