शरद पवारांनी नाराजी व्यक्त करायला केला उशीर, चंद्रकांत पाटलांनी केली टीका

शरद पवार(Sharad Pawar) यांनी सरकारमध्ये जी भूमिका बजावायला हवी होती ती बजावली नाही. अंकुश ठेवण्याची त्यांची भूमिका हवी होती. ते आता नाराजी व्यक्त करत असतील तर खूप उशीर झाला आहे अशी मार्मिक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केली आहे.

    कोल्हापूर :  शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करायला खूप उशीर केला. राज्याचे आर्थिक आणि वैद्यकीय क्षेत्राचे पूर्ण वाटोळे झाल्यावर प्रश्न मांडत आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांनी सरकारमध्ये जी भूमिका बजावायला हवी होती ती बजावली नाही. अंकुश ठेवण्याची त्यांची भूमिका हवी होती. ते आता नाराजी व्यक्त करत असतील तर खूप उशीर झाला आहे अशी मार्मिक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केली आहे.

    त्यांनी मराठा समाजाला काय दिले ?
    मराठा समाज त्यांच्या गाड्यांच्या मागे धावला पण त्यांनी मराठा समाजाला काय दिले? असा उपरोधिक सवाल करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोना स्थितीवरुन पवार नाराज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्या अनुषंगानेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेनेचे  मातोश्री, वर्षा आणि सिल्व्हर ओक या बंगल्यांवर चकरा मारताना पाहायला दिसत आहेत.

    बंद पडणाऱ्या स्कुटरवर फिरणाऱ्यांची संपत्ती कशी ?
    पाटील म्हणाले की, सुरुवातीला ते कसे होते. त्यांची संपत्ती किती होती आणि आता त्यांची संपत्ती किती आहे पाहा. बंद पडणाऱ्या स्कुटरवर फिरणाऱ्यांची आज एवढी संपत्ती कशी? मराठा समाजातील या नेत्यांनी कोणत्या तरुणाला डॉक्टर केले का? इंजिनिअर केले का?असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यातील आंबिल ओढा तोड कारवाई प्रकरणात अजितदादांचा हात असल्याचे पुरावे द्या असे म्हणायची वेळ खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर येते यातच सगळे आले, अशी टीकाही पाटील यांनी केली.