दत्त ग्राहक संस्थेचा वस्तुरूपात लाभांश; गणपतराव पाटील यांची माहिती

    जयसिंगपूर : शिरोळ येथील श्री दत्त ग्राहक संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी २०२०-२१ या सालासाठी सभासदांना दहा टक्केप्रमाणे लाभांश वस्तू रुपाने येत्या दीपावलीत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganapatrao Patil) यांनी दिली.

    श्री दत्त ग्राहक संस्थेची वार्षिक सभा श्री दत्त साखर कारखाना संस्थेच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले. नोटीस वाचन शाखा व्यवस्थापक सदानंद घोरपडे यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामोदर सुतार यांनी लॉकडाऊन काळात शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाप्रमाणे शासनाच्या निर्बंधाचे पालन करत संस्थेच्या सर्व सेवा सुरु ठेवल्या असल्याचे सांगितले.

    यावेळी उपाध्यक्षा अनिता कोळेकर, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, विजयकुमार गाताडे , सुहास मडिवाळ, भाऊसो पाटील, दीपक ढोणे, शहाजान बाडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. राजश्री पाटील यांनी आभार मानले.