व्यापारी प्रशासनात संघर्ष ; सामंजस्याने तोडगा काढण्याचा निर्णय  

गेल्या दोन महिन्यापासून शहरातील दुकाने बंद असल्याने जगणे असह्य झाले आहे रविवारी झालेल्या व्यापारी असोशिएशनच्या बैठकीत आज सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय झाला आनि  कोल्हापुरातील राजारामपुरी, महाद्वार रोड व्यापाऱ्यांनी आज सकाळपासून दुकाने उघडी केली होती. यावेळी जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सांगितले त्यामुळे काही तणाव निर्माण झाला

    कोल्हापूर: कोरोनाची दुसऱ्या लाट अध्याप ओसरलेली नसताना तसेच जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने प्रशासनाचा आदेश डावलून शहरातील व्यावसायिकांनी सोमवारी दुकाने सुरु केली. मात्र प्रशासनाने ती पुन्हा बंद केली यावेळी व्यापारी आणि शासकीय अधिकारीशाब्दिक चकमक होऊना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    गेल्या दोन महिन्यापासून शहरातील दुकाने बंद असल्याने जगणे असह्य झाले आहे रविवारी झालेल्या व्यापारी असोशिएशनच्या बैठकीत आज सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय झाला आनि  कोल्हापुरातील राजारामपुरी, महाद्वार रोड व्यापाऱ्यांनी आज सकाळपासून दुकाने उघडी केली होती. यावेळी जिल्हा प्रशासनाने दुकाने बंद करण्यास सांगितले त्यामुळे काही तणाव निर्माण झाला.

    यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यापारी संघटनेबरोबर बैठक घेऊन त्यांची समजूत घातली पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी दुकाने उघडण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवू तोपर्यंत दुकाने बंद ठेवा असे समजावले . त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पण दोन दिवसात निर्णय झाला नाही तर सर्व दुकाने सुरु करणार असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. त्यामुळे सकाळी उघडलेली दुकाने पुन्हा शटर डाऊन करावे लागले .पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटून दुकाने सुरु करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगतिले .