सायकलवरून प्रभागफेरी करणारा ‘नगरसेवक’; कोल्हापूरच्या माजी उपमहापौरांचा स्तुत्य उपक्रम

दररोज सकाळी सहा वाजल्यापासून ते सायकलवरून आपल्या प्रभागात फेरी मारून लोकांशी ते संपर्क साधतात.त्यांच्या अडचणी जाणून घेतात आणि प्रभागातील सर्व प्रश्न मार्गी लावतात. नगरसेवक असताना प्रभागात सायकलवरून फिरून नागरिकांचे प्रश्न सोडवणारे संजय मोहिते हे शहरातील लोकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.

कोल्हापूर: सकाळी सहा वाजता सायकलवरून प्रभागात फेरी मारणारा, प्रभागातील लोकांच्या अडचणी-समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करणारा, प्रभाग स्वच्छ-लखलखीत ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घेणारा, लोकांच्या सुख-दुःखातील हक्काचा साथीदार अशी कितीतरी विशेषणे लावता येतील, असे येथील माजी उपमहापौर संजय मोहिते यांचे कार्य आहे. येथील साइक्स एक्स्टेन्शन प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या मोहिते यांच्या कार्यशैलीमुळे प्रभागाला गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर महापालिकेचे संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्वच्छ आणि सुंदर प्रभागाबरोबरच आपला आदर्श प्रभाग व्हावा हा ध्यास घेऊन गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेत साईक्स एक्सटेन्शन या प्रभागाचे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मोहिते काम करत आहेत. प्रभागातील जे प्रश्न आहेत त्याचा निपटारा करण्यासाठी स्वतःला झोकून देत काम करत आहेत. त्यांच्या कामामुळे गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेचे संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे पाच पुरस्कार पटकावले आहेत. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून ते सायकलवरून आपल्या प्रभागात फेरी मारून लोकांशी ते संपर्क साधतात.त्यांच्या अडचणी जाणून घेतात आणि प्रभागातील सर्व प्रश्न मार्गी लावतात. नगरसेवक असताना प्रभागात सायकलवरून फिरून नागरिकांचे प्रश्न सोडवणारे संजय मोहिते हे शहरातील लोकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. अगदी त्यांच्या भागात ड्रेनेज जरी तुंबले तरी ते स्वतः त्या ठिकाणी थांबून महानगरपालिका कर्मचारी यांच्याकडून काम करवून घेतात. प्रभागात एका ठिकाणी काम करताना सलग तीन दिवस सकाळी सात ते संध्याकाळी सात दिवस भर थांबून त्यांनी ड्रेनेज काम करून घेतले आहे.

साइक्स एक्सटेन्शन प्रभागाचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर संजय मोहित गेल्या दहा वर्षापासून या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत प्रभागांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच स्वच्छ आणि सुंदर प्रभाग राहावा हाच ध्यास मनी बाळगून ते कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षात त्यांनी प्रभागांमध्ये तीन कोटींहून अधिक निधी खेचून विकास सुरू केलाय. या निधीच्या माध्यमातून रस्ते, ड्रेनेज लाईन, गार्डन विकसित करणे, विरंगुळा केंद्र, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक अशी विविध कामे करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नियमितपणे आपली सायकल घेऊन प्रभागामध्ये फिरत आहेत. आपले आरोग्य चांगले राहावे , लोकांशी थेट संपर्क रहावा, त्यांच्या अडचणी त्यांच्या दारात जाऊन सोडवाव्यात,यासाठी ते सायकल घेऊन फिरतात. या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याबरोबरच प्रशासनाच्या सहकार्याने जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचे काम करतात. आपला प्रभाग स्वच्छ राहावा यासाठी ते प्रामुख्याने धडपडत आहेत.

संजय मोहिते हे स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे त्यांनीं आपल्या प्रभागात ‘वर्ल्ड कप सेल्फी कॉर्नर’ तयार केला आहे. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या दोन्ही वेळच्या टीम मधील खेळाडूंचे फोटो त्यांनी या ठिकाणी लावले आहेत.त्याच बरोबर अमिताभ बच्चन यांचे ते चाहते असल्याने ‘महानायक सहवास’ या नावाने जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार केले आहे.

मोहिते यांच्या या कामामुळे त्यांच्या प्रभागातील नागरिकही त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. रोज सकाळी सहा वाजल्यापासून फिरणारा हा लोकसेवक कंटाळा न करता नियमितपणे आपल्याशी संवाद साधतो संपर्क करतो काय प्रश्न आहेत ते व्यक्तिगत पातळीवर विचारतो प्रश्नाची सोडवणूक करतो. याचा अभिमान वाटत असल्याचं या भागातील नागरिक सांगतात