डॉ. बी.एम.सरगर यांची प्रोफेसरपदी निवड

शिक्षण क्षेत्रात प्रोफेसर पद हे सर्वोच्च व प्रतिष्ठित मानले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवाल व शिफारशीवरून ही पदोन्नती दिली जाते. प्रोफेसर पदासाठी विद्यापीठाकडून विविध निकष लावले जातात. यासाठी तज्ज्ञ समितीपुढे प्राध्यापकांना विशिष्ट निकषांची पूर्तता व त्यांचे संशोधन कार्य सादर करावे लागते.

    शिरोली : रसायशास्त्र विभागाच्या एम एस्सी या पदव्युत्तर विभागाचे प्रमुख समन्वयक डॉ.बी.एम.सरगर यांची नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या कॅस अंतर्गत प्रोफेसर या सर्वोच्च पदावरती पदोन्नती झाली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हे यश त्यांनी मिळविले आहे. या आधी ते सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत होते.

    शिक्षण क्षेत्रात प्रोफेसर पद हे सर्वोच्च व प्रतिष्ठित मानले जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवाल व शिफारशीवरून ही पदोन्नती दिली जाते. प्रोफेसर पदासाठी विद्यापीठाकडून विविध निकष लावले जातात. यासाठी तज्ज्ञ समितीपुढे प्राध्यापकांना विशिष्ट निकषांची पूर्तता व त्यांचे संशोधन कार्य सादर करावे लागते.

    प्रोफेसर डॉ. सरगर हे जयसिंगपूर कॉलेज मध्ये गेली १९ वर्षे अध्यापनाचे कार्य करीत असून सध्या ते एमएस्सी रसायनशास्त्र या विभागाचे प्रमुख समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये ३५ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. सौर ऊर्जा, फोटोकॅटालायसीस, गॅस सेन्सिंग, सॉल्व्हन्ट एक्सट्रेक्शन या संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत २ विद्यार्थ्यांनी आपली पीएच. डी प्रबंध सादर केला आहे तर ४ विद्यार्थी पीएच डी शिक्षण घेत आहेत. तसेच ते भारतातील अनेक विद्यापीठाचे पी.एच.डी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.डॉ. सरगर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या निवडीमुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.