कोल्हापुरातील राजारामपुरीत गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघे गंभीर जखमी

    कोल्हापूर : राजारामपुरी दुसरी गल्ली टाकाळा परिसरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन या दुर्घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले. मोहिनुद्दीन जमादार (वय ७०) आणि नियाज जमादार (वय ५५ रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी पहाटे ही घटना घडली.

    सोमवारी पहाटे जमादार यांच्‍या घरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.