
रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारख्या जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घ्यावे आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे.
शिरोळ : रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारख्या जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घ्यावे आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील अज्ञात शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयातच साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जंगली प्राण्यांची जोपासणा व संवर्धन करणे ही संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. यामुळे हे प्राणी जर चुकून आपल्या शेतात आले तर त्यांना त्यांच्या सरक्षणार्थ सरकारी कार्यालयात सोडणे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडण्यासाठी शेतकऱ्यांनी साप पकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केले होते.
ही घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या गेटमध्ये अज्ञात शेतकऱ्यांनी साप सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे स्वभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.