धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार

गोळीबार करणाऱ्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या  युवकाने राहत्या घरातून पलायन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून अधिक तपासकार्य चालू आहे.

  कोल्हापूर : शहराच्या जवळ असलेल्या कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी पहाटे एका युवकाने प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद कळंबा पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

  याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंबा तलाव येथे रात्रीच्या सुमारास प्रेम प्रकरणातून छऱ्याच्या बंदूकीतून एका तरुणाने तरुणीवर गोळीबार केला. या घटनेनंतर कळंबा गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात आहे.

  पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

  अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील, एलसीबीचे  पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकणाची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित तरुणीला आणि तिच्या आईला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  गोळीबार करणारा तरुण पसार

  गोळीबार करणाऱ्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या  युवकाने राहत्या घरातून पलायन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून अधिक तपासकार्य चालू आहे.