‘शरद’मध्ये राज्यातील पहिले ए.आय. अँड डी.एस.चे एम.टेक. सुरू; अनिल बागणे यांची माहिती

पदवी अभ्यासक्रमासाठी ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम सुरू झाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी दिली.

    जयसिंगपूर : यड्राव (ता.शिरोळ) येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड डाटा सायन्स व मेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या पदव्युत्तर पदवी (एम. टेक.) अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे.
    दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी १२ जागेस मान्यता मिळाली आहे. तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम सुरू झाल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी दिली.

    अद्ययावत कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी शरद नेहमीच अग्रेसर राहिले आहे. औद्योगिक क्षेत्रातील गरज ओळखून नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी संस्था नेहमी अद्ययावत अभ्यासक्रम सुरू करत आहे. अभ्यासक्रमाच्या वाढीव जागेमुळे महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शरदमध्ये शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी संस्था नेहमी अग्रेसर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ते म्हणाले, गेल्या तेरा वर्षांपासून शरद इन्स्टिट्यूटने शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान व यशस्वी वाटचाल हे वाढीव जागेच्या रूपाने अधोरेखित झाले आहे. इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमांना एन.बी.ए. मानांकन मिळाले आहे. शरद अभियांत्रिकी हे ११ व्या वर्षी स्वायत्त (ॲटोनॉमस) होणारे पहिले महाविद्यालय आहे. तसेच आय.एस.ओ. प्रमाणपत्र व नॅकचे मूल्यांकनही मिळाले आहे. औद्योगिक क्षेत्रात सध्या बहु अनुशासनात्मक शाखेचे ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स ‘या दोन शाखा एकत्रित करून मेकॅट्रॉनिक्स तर इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर मिळून इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे.