Flood crisis averted in Kolhapur; After six hours, the locked door of Radhanagari was opened

राधानगरी धरणाचा मुख्य दरवाजा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर बंद करण्यात यश मिळविले. शर्थीच्या प्रयत्नानंतर धरणाचा दरवाजा तब्बल सहा तासांनी दुपारी 3.10 वाजता बंद झाला. दरवाजा बंद झाल्याने विसर्ग बंद झाला आहे. राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्याने पाणीपातळीत अचानक वाढ झाली होती(Flood crisis averted in Kolhapur; After six hours, the locked door of Radhanagari was opened).

    कोल्हापूर : राधानगरी धरणाचा मुख्य दरवाजा जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर बंद करण्यात यश मिळविले. शर्थीच्या प्रयत्नानंतर धरणाचा दरवाजा तब्बल सहा तासांनी दुपारी 3.10 वाजता बंद झाला. दरवाजा बंद झाल्याने विसर्ग बंद झाला आहे. राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्याने पाणीपातळीत अचानक वाढ झाली होती(Flood crisis averted in Kolhapur; After six hours, the locked door of Radhanagari was opened).

    नदीपात्रात वाढला होता विसर्ग

    सकाळी पावणे नऊच्या सुमारास राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा 18 फूट पूर्ण उघडून अडकला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाची यंत्रणा जोरात कामाला लागली होती.

    स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य

    गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्‍या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव आहे. कोल्हापूर शहरापासून 35 मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे.