Former MP Dhananjay Mahadik's serious allegations against Satej Patel

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गृह राज्यमंत्री सतेज पाटील उमेद्वारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतेज पाटील निवडून आले तरी तीन महिन्यांच्या आत त्यांची आमदारकी घालवणार असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच महाडिक यांनी सतेज पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत (Former MP Dhananjay Mahadik's serious allegations against Satej Patel).

    कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गृह राज्यमंत्री सतेज पाटील उमेद्वारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतेज पाटील निवडून आले तरी तीन महिन्यांच्या आत त्यांची आमदारकी घालवणार असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. तसेच महाडिक यांनी सतेज पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत (Former MP Dhananjay Mahadik’s serious allegations against Satej Patel).

    सतेज पाटील यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरताना काही माहिती लपवली आहे. काही माहिती चुकीची दिली आहे. कसबा बावडा याठिकाणी असलेली 5 गुंठे जमीन सतेज पाटील यांच्या नावावर आहे ती माहिती पाटील यांनी लपवली. तसेच ताराराणी चौक याठिकाणी असलेली जमीन कमी दाखवली आहे, यामध्ये 53 हजार 98 स्क्वेअर फिट त्यांच्या नावावर आहे. सयाजी हॉटेल संदर्भातही त्यांनी पालिकेला चुकीची माहिती दिली आणि योग्य घरफाळा भरलेला नाही असा आरोप महाडिक यांनी केला.

    पाटील यांनी कॉसमॉस बँकेकडून 85 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचा विनियोग कशासाठी केला याची माहिती दिलेली नाही. महसूल बुडावल्याची नोटीस देखील त्यांना देण्यात आली असता कोणतंही देणं लागत नाही असं सादरीकरणात म्हटल आहे.  या सगळ्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे महाडिक म्हणाले.