राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या चार ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्यामार्फत शेतकरी, सर्वसामान्य जनता नागरिक यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आपण शिवसेनेत ज्या विश्वासाने प्रवेश करत आहात त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

    गारगोटी : भुदरगड तालुक्यातील मडूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या घावरेवाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव करवळ, चोपडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य धनाजी चोपडे, फगरेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग फगरे व कासारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य धनाजी कदम यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा झेंडा हातात घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
    यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, राज्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्यामार्फत शेतकरी, सर्वसामान्य जनता नागरिक यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. आपण शिवसेनेत ज्या विश्वासाने प्रवेश करत आहात त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही. तसेच आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने कामे सुरु आहेत, त्याचप्रमाणे आपल्या गावातील देखील विकासकामे पूर्ण होतील, असे आश्वासन यावेळी दिले. तसेच राष्ट्रवादी व भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे मी स्वागत करतो.
    चोपडेवाडीचे ग्रा. पं. सदस्य म्हणाले की, आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेनेच्या माध्यमातून करत असलेली विकासकामे पाहून त्यांच्या स्वप्नातील गाव घडावे यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शामराव चोपडे, शिवाजी रक्ताडे, एम. एस. पाटील, कृष्णात पाटील, रणजित येसादे, सुर्याजी घावरे, मानसिंग फगरे, नारायण मोरे, वसंत रेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
    यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, पंचायत समिती सदस्य सुनिलराव निंबाळकर, युवासेना तालुका अधिकारी विद्याधर परीट, मडूर गावचे प्रमुख विष्णू मोरे, आश्रू फगरे, शशी फगरे, युवराज लाड, युवराज फगरे, चंद्रकांत माने, बंडेराव फगरे, दशरथ म्हसवेकर, सुनिल पाटील, विश्वास रणदिवे, कृष्णात करवळ, अजय चोपडे, भिकाजी चोपडे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.