निरपेक्ष कार्याला सलाम!  प्रणव झुटाळचे अभियंता बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार ; राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उचलली जबाबदारी

यड्राव (ता.शिरोळ) येथील आपत्कालीन परिस्थितीत मदत करताना मृत्यू पावलेल्या प्रदीप झुटाळ यांचा मुलगा प्रणवची शैक्षणिक जबाबदारी घेऊन शरद पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश दिला. त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा दिलेला शब्द आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला होता.

    जयसिंगपूर: सामाजिक काम करताना मृत्यू पावलेल्या प्रदीप झुटाळ यांच्या अनाथ मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली. प्रणव झुटाळ याला शरद पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश दिला आहे . प्रणवला शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतले असून त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतल्याचे पत्र संस्थेचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी त्याला दिले.

    यड्राव (ता.शिरोळ) येथील आपत्कालीन परिस्थितीत मदत करताना मृत्यू पावलेल्या प्रदीप झुटाळ यांचा मुलगा प्रणवची शैक्षणिक जबाबदारी घेऊन शरद पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकी पदविकेला प्रवेश दिला. त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा दिलेला शब्द आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला होता.

    चार वर्षांपूर्वी नांदणी येथे विहिरीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढत असताना श्वास गुदमरून प्रदीप शिवाजी झुटाळ (रा. टाकवडे) यांचा मृत्यू झाला होता. अंगणवाडीत सेविका म्हणून काम करणाऱ्या पत्नीवर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आहे. त्यावेळी सांत्वनासाठी गेलेले यड्रावकर यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार प्रणव दहावी पास झाल्यानंतर त्याला शामराव पाटील- यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टकडून शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. दत्तक घेतल्याचे पत्र यड्रावकर व एक्झि. डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते देण्यात आले.